6th November 2024 / प्रतिनिधी
सातारा: सातारा- जावली मतदारसंघात विकासकामांचा झंझावात करतानाच सातारा शहराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवेंद्रराजेंनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली होण्यासाठी त्यांच्या प्रयत्नातून शासकीय मेडिकल कॉलेज सुरु झाले. अजिंक्यतारा किल्ल्यावरील रस्त्यासह शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यास प्रारंभ केला आहे. शहराची हद्दवाढ करून भरीव विकासनिधी त्यांनी सातारा शहरासाठी आणला. या निवडणुकीत मतदानरूपी प्रेमाचा वर्षाव करून शिवेंद्रराजेंना महाराष्ट्रात नंबर १ चे मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ तामजाईनगर आणि शाहूपुरी येथे आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मतदार संघ निरिक्षक अविनाश जाधव, सुनिती शहा, प्रकाश गवळी, ॲड.दत्तात्रय बनकर, अविनाश कदम, धनंजय जांभळे, बाळासाहेब खंदारे, शिरीष चिटणीस, राजेंद्र लावंघरे, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, अक्षय जाधव, बबलू जाधव, सुहास वहाळकर,राजूशेठ गिरीगोसावी, सिध्दार्थ निकाळजे, नितीन तरडे, तुषार जोशी, सौ.शोभाताई केंडे, सौ.माधवीताई शेटे, वसंतराव शिंदे, नीलम देशमुख, विकास देशमुख, महेंद्र गार्डे, राजाभाऊ गावडे, विकी घोगरे, प्रदीप निकम, सुरेश चव्हाण, धोंडीराम जाधव, डॅनियल खुडे, राजश्री राजमाने, इकबाल काझी, मंजुषा निकम, शोभा दरेकर, मनीषा जाधव, शिवाजी भंडारे, रोहिणी चव्हाण, संदीप ननावरे, शिवाजी भंडारे, दिलीप चव्हाण, शंकर भोसले, अक्षय भोसले, जय बेलोशे, पंकज चव्हाण, श्रीराम गलगले, श्रेयश देशमुख, शिवम चव्हाण, रवी पवार, गणेश पवार यांच्यासह सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा शहरातील जातीय सलोखा, शांतता ही फक्त दोन्ही राजांमुळे टिकून असते. कुठेही काहीही झाले तरी दोन्ही राजांकडे आपण सर्वजण जातो. कोणाचाही कसलाही प्रश्न दोन्ही राजेच सोडवतात. आपण सातारकर आहोत. आज आपली सातारकरांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्य देऊन आपण सर्वांनी त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
दरम्यान , यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.