पदयात्रेत साविआ,नविआच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
सातारा,(प्रतिनिधी) : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु असून महायुतीतील घटकपक्षांसह साविआ, मविआच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत शहरात प्रचारमोहीम मोठ्या उत्स्फूर्तपणे राबवल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी सातारा शहरातील तालिमखाना, फुटका तलाव, औताडे घर, एकता चौक, गोलमारुती चौक, सुपनेकर घर, दत्त मंदिर, फुटका तलाव, मारवाडी चौक अशी विराट पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेत आ. शिवेंद्रराजेंसमवेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सातारा शहरातील सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी या दोन्ही स्थानिक राजकीय आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
सातारा शहरात ठिकठिकाणी या पदयात्रेचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.