रवींद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम

सातारा

सातारा,(प्रतिनिधी): येथील संजीवन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी रवींद्र उत्तमराव कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.१३ रोजी सातारा शहर व परिसरात विविध सामाजिक उपक्रम व भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवणारे समाजसेवक म्हणून श्री. कांबळे यांची ख्याती आहे. होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप तसेच विशेष मुलांना मिष्टान्न भोजन आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप व त्यांच्या नातेवाईकांना भोजन आदी उपक्रमांसह विविध सामाजिक अध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संजीवन संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

श्री रवींद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता चिपळूणकर बागेशेजारील भोई गल्ली येथील राहत्या घरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजता श्री क्षेत्र यवतेश्वर येथील मंदिरात देवदर्शन व पूजा करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता उपळी येथील स्वर्गीय शारदाबाई पवार आश्रमशाळा येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता आसनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील होतकरू २ मुली व ५ मुले शिक्षणासाठी दत्तक घेतले जाईल व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता, आशा भवन, रहिमतपूर रोड, कोडोली येथील विशेष मुलांना खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय दुपारी १ वाजता हॉटेल प्रियांका, शेंद्रे येथे केक कापून हितचिंतकांच्या शुभेच्छांचा स्वीकार व मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.सायंकाळी ५:३० वाजता मंगळवार पेठेतील शाहू बोर्डिंग सातारा येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता पोवई नाक्यावरील भाजी मंडई- मार्केट यार्ड येथे केक कापून त्यानंतर शुभेच्छांचा स्वीकार करण्यात येणार आहे.रात्री ८ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये दरपत्रके लावण्यात यावीत, विद्युत वाहक तारांचे जीर्ण खांब बदलण्यात यावेत, विद्युत वाहक तारांऐवजी अंडरग्राउंड केबल टाकण्यात याव्यात, जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा व शवागारात रेफ्रिजरेशनची असावी आदी विविध सामाजिक प्रश्नांवरून श्री कांबळे यांनी सातत्याने आवाज उठवला असून सामाजिक बांधिलकीतून विविध घटकांना मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी व्यापार उद्योगात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या नियोजित सर्व सामाजिक उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा.