‘बेडर – बेरड जात महाराष्ट्रात उपेक्षित राहिली’ सदाशिव नाईक यांची खंत

सातारा

महायुती सरकारने विशेष लक्ष घालून प्रश्न सोडवण्याची मागणी

सातारा,(प्रतिनिधी) : हजारो वर्षापासूनच्या इतिहासात बेडर बेरड हा निर्भयपणे लढणारी जात आहे. प्रामाणिकपणा इमानदारी आणि लढाऊ वृत्ती असलेल्या बेरड जातीवर इंग्रजांच्या काळात “चोर, लुटारू” असा शिक्का मारला गेला आणि मुख्य प्रवाहापासून बेडर – बेरड अनेक मैल दूर गेला. आजही देखील महाराष्ट्रात खेडोपाड्यात विखुरलेल्या अवस्थेत अल्पसंख्य असलेले आर्थिक सांस्कृतिक प्रगती झाली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जनजाती बेडर बेरड समाज उत्थान समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सदाशिव नाईक यांनी व्यक्त केली आहे.

याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात श्री. नाईक यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्रात बेडर बेरड जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा आणि आरक्षणाचा लाभ द्यावा, ही मागणी गेले अनेक वर्ष पासून बेडर बेरड जातीतील बांधव आणि आदिवासी बेडर बेरड समाज उत्थान समिती महाराष्ट्र करत आहे. मात्र त्याकडे महाराष्ट्र शासन व राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. समाज बांधव एकसंघपणे या मागणीसाठी पुढे येत आहेत.गेल्या काही वर्षांपासून काम करताना जातीसाठी ठोस स्वरूपाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी बेडर बेरड समाज उत्थान समिती आरक्षण चळवळ व्यापक करत आहे.बेडर बेरड जातीच्या आरक्षणासाठी ठोसपणे लढा उभा करून ही चळवळ जातीच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री. नाईक गेले अनेक वर्षापासून काम करत असून त्यामध्ये बेडर बेरड जातीतील बांधव महिला युवक युतीकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे.

बेडर बेरड जातीतील सर्वांनी एकजुटीने लढा उभारल्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही याची मला खात्री विश्वास आहे, आरक्षणाच्या प्रश्नावर आत्तापर्यंत बेडर बेरड जातीतील अनेक बांधवांनी एकजूट बांधून लढा दिला असून त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे. मी एक व्यक्ती म्हणून या लढ्याचे मी नेतृत्व करत असताना समाजातून जे पाठबळ प्रतिसाद मला लाभत आहे ते आशादायी आहे. त्यामुळे बेडर बेरड जातीच्या सर्वांगीण विकासाच्या विचार करत चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही सदाशिव नाईक यांनी म्हटले आहे.

बेडर बेरड जातीच्या आरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न आहेच, मात्र त्याबरोबर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. सुशिक्षित झालेल्या समाजातील युवक- युवतींना आरक्षण चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी व्यसनाधीनता दूर करण्याबरोबरच बेडर बेरड बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा माझा मानस आहे. बेडर बेरड जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून तातडीने आरक्षणाचा लाभ घ्यावा, यासाठी लोकशाही मार्गाने मी चळवळ उभी करत आहे. या बरोबरच बेडर बेड जातीचे जमिनीचे प्रश्नाबाबत मी आवाज उठवत आहे. बेडर बेरड जातीतील मुले शिकून विकास साधण्यासाठी एकजुटीने ताकद दाखवत आहेत. जातीचे प्रश्न राज्य पातळीवर नेण्यासाठी आदिवासी बेडर बेरड समाज उत्थान समिती महाराष्ट्र मजबूत कार्य करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी खंत सदाशिव नाईक यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल या तालुक्यात बेरड म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्ह्यात मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यात बेरड म्हणून ओळखले जाते, सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट तालुक्यात बेडर-बेरड म्हणून ओळखले जाते उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा, परंडा, तुळजापूर तालुक्यात बेरड – बेरड म्हणून ओळखले जाते.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुका बेडर-बेरड म्हणून ओळखले जाते. बीड जिल्ह्यात बेडर- बेरड म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यात दोन प्रभागांमध्ये आम्हाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे. आणि बेरड विमुक्त जाती ‘अ’ मध्ये समावेश आहे. मात्र बेरड बेडर हा जात महाराष्ट्रात एकच आहे आणि रोटी बेटी आमची गेले कित्येक पिढीपासून होत आलेल्या आहेत. परंतू महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये आमची रोटी बेटी व्यवहार होत आहेत. कर्नाटक राज्यामध्ये बेडर जातीला अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. परंतू महाराष्ट्रात दोन प्रभागात समावेश केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने बेडर हा शब्द संबोधित करून आम्हाला अनुसूचित जातीचा दाखला मिळावा, अशी मागणीही सदाशिव नाईक यांनी केली आहे.