“रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो – २०२४”ला साताऱ्यात उत्साहात प्रारंभ

सातारा

बिल्डर असोसिएशनतर्फे आयोजन ; खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजेंसह विविध मान्यवरांची उपस्थिती

सातारा,(प्रतिनिधी) : गृह प्रकल्प विषयक पश्चिम महाराष्ट्राचे विशेष आकर्षण असणार्‍या “रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो २०२४” या भव्य बांधकाम प्रदर्शनाचे उदघाटन ढोल -ताशांच्या निनादात, शिंग तुतार्‍यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले व महाराष्‍ट्र राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या शुभहस्‍ते व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नॅशनल व्‍हाईस प्रेसीडेंट आनंद गुप्‍ता, बीएआय चे महाराष्ट्र स्टेट चेअरमन अनिल सोनवणे, नॅशनल सेक्रेटरी मोहिंदर रिझवाणी, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी नॅशनल प्रेसिडेंट अविनाश पाटील, भगवानराव देवकर, माजी स्‍टेट चेअरमन सुधीर घार्गे, दत्ताजी मुळे, सचिन देशमुख व क्‍लासिक ग्रुपचे डायरेक्‍टर सुमित बगाडे, स्‍कॉन इन्‍फ्रा प्रिस्‍ट्रेस एल.एल.पी. चे मॅनेजिंग डायरेक्‍टर उमेश भुजबळराव, कंग्राळकर असोसिएटस्‌चे चेअरमन श्रीधर कंग्राळकर, स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या चिफ मॅनेजर आकांक्षा भूमिवाल, कालिका स्‍टीलचे प्रमोटर आणि फाऊंडर अनिल गोयल, परफेक्‍ट हाऊसचे चेअरमन विपुल गिलानी व बिल्डर्स असोसिएशनचे सातारा सेंटर चेअरमन सुधीर ठोके, व्हाईस चेअरमन सयाजी भोसले, सेक्रेटरी हर्षद वालावलकर, खजिनदार पृथ्‍वीराज पाटील, कौन्सिल मेंबर अनिल दातीर, सुधीर घारगे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग कार्यक्रमात संपन्न झाले.

यावेळी बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बिल्‍डर्स असोसिएशनच्‍या सातारा सेंटरचे कौतुक केले. ऐतिहासिक सातारा शहरात “रचना”सारख्‍या भव्य वास्तू प्रदर्शनाचे नियमितपणे आयोजन करून सातारा सेंटरने देशभर नावलौकीक मिळवल्‍याबद्दल सातारा सेंटरचा गौरव केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात सातारा जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी आपण भरीव योगदान देणार असल्‍याचे सांगत बिल्‍डर्स असोसिएशनच्‍या माध्‍यमातून अनेक प्रकल्‍प सातारा जिल्‍ह्यात आणण्‍याचे वचन दिले.

यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सुधीर ठोके म्हणाले की, सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे “रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो २०२४” या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य मंडप, आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिस्टीम्स, आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे भव्य दिव्य आयोजन आहे. ‘रचना’च्या यशस्वी आयोजनाचे हे तेरावे वर्ष आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. प्रदर्शनास भेट देणार्‍यांची संख्‍याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे चार लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देतील व सुमारे १२० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होईल, ही अपेक्षा आहे.

यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर ठोके यांनी तर आनंद गुप्‍ता यांचा सत्कार सेक्रेटरी हर्षद वालावलकर, अनिल सोनवणे यांचा सत्‍कार खजिनदार पृथ्‍वीराज पाटील यांनी व अन्य मान्यवरांचा सत्कार उपाध्यक्ष सयाजी भोसले व पदाधिकारी यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साहिल शेख यांनी केले. सेक्रेटरी हर्षद वालवलकर यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी ‘रचना’ प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सची पहाणी करून माहिती घेतली.

उद्घाटन समारंभास बिल्डर्स असोसिएशनचे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बारामती, इचलकरंजी, फलटण, पंढरपूर व अन्य शहरातील पदाधिकारी, सातारा सेंटरचे सर्व पदाधिकारी, बिल्‍डर्स असोसिएशच्‍या महिला विंग स्‍फूर्तीच्‍या सर्व सदस्य व कुटुंबिय मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

“रचना २०२४” प्रदर्शन हे जिल्‍हा परिषद मैदानावर दि. २६ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत सलग चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत आयोजित केले असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. या प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.