‘भूमिशिल्प’चे पद्माकर सोळवंडे, ‘पुढारी’चे आदेश खताळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

सातारा

शरद महाजनी यांचेतर्फे सातार्‍यात गुरुवारी पुरस्कार वितरण समारंभ

सातारा,(प्रतिनिधी): ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्यांच्या आई- वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पहिला पुरस्कार ‘भूमिशिल्प’चे संपादक पद्माकर सोळवंडे व दैनिक ‘पुढारी’चे आदेश खताळ यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार (गुरुवारी) सकाळी 11.30 वाजता दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात प्रदान केला जाणार आहे.

दोन्ही पत्रकारांचा सन्मान दैनिक ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी पत्रकारितेमध्ये भरीव योगदान दिले आहे. दै. ‘ऐक्य’, दै. ‘पुढारी’ येथे दीर्घकाळ सेवा केल्यानंतर सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. नुकत्याच सातारा पत्रकार संघाच्या निवडी झाल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या आई-वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी जानेवारी महिन्यात दोघांना आदर्श पत्रकार पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व रोख 2500 रुपये असे राहणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी यावर्षीपासून सुरु केलेल्या पहिल्या पुरस्कारासाठी आदेश खताळ व पद्माकर सोळवंडे यांना पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली. आदेश खताळ गेल्या 15 वर्षांपासून दैनिक ‘पुढारी’मध्ये कार्यरत आहेत. पद्माकर सोळवंडे देखील गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. दोन्ही पत्रकार सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर विपुल लेखन करत आहेत. अनेक विषयांवर वृत्त मालिका करुन त्यांनी वाचा फोडली आहे.

पुरस्कार वितरण गुरुवारी सकाळी 11.30 वा. दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाजनी यांनी केले आहे.