सरताळेतील ‘लाडक्या बहिणी’ शिवेंद्रराजेंना मताधिक्य देणार

सातारा

सातारा,(प्रतिनिधी): महायुती सरकारमुळे गोर गरीब जनतेचे जीवन सुसह्य झाले आहे. सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्यामुळे आमच्या गावाचा सर्वांगीण विकास झाला असून या आमच्या भावाला मताधिक्य देऊन विजयी करणार, असा निर्धार सरताळे ता. जावली येथील माता- भगिनींनी केला.

सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सरताळे येथील असंख्य महिलांशी सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच अमृता जाधव, उपसरपंच दिनेश गायकवाड, माजी सरपंच सोनाली राजाराम पवार, सदस्य सुनील धुमाळ, बारीकराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवेंद्रराजेंना १ नंबरच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः प्रचार करू, असे महिलांनी यावेळी सांगितले. आ. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून आमच्या गावाला भरीव विकासनिधी सातत्याने उपलब्ध झाला असून त्यामुळे गावातील विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लागले आहेत. आमच्या गावासह जावलीतील सर्वच गावामध्ये आ. शिवेंद्रराजेंनी असंख्य विकासकामे मार्गी लावली आहेत. आमचे संपूर्ण गाव शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आम्ही त्यांना मताधिक्य देऊ आणि विजयी करू, असे दिनेश गायकवाड यावेळी म्हणाले.