क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय : आ. शिवेंद्रराजे

सातारा

जयंतीनिमित्त क्रांतिगुरुंच्या पुतळ्याला केले अभिवादन

सातारा,(प्रतिनिधी): आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांचे कार्य अतुलनीय असून आपल्याला कायम प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील क्रांतिगुरुंच्या पुतळ्याला आ. शिवेंद्रराजेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आप्पा लोखंडे, बंडू घाडगे, सचिन कांबळे, श्रीकांत कांबळे, कांतीलाल कांबळे, शशिकांत कांबळे, अण्णा वायदंडे, अय्याज शेख, सोमनाथ पाटोळे, विजय बडेकर, अविनाश कदम, अमोल मोहिते, अनिल लोखंडे, प्रतीक घाडगे, दीपक गाडे, रघुनाथ बाबर, संग्राम कांबळे, विशाल लोखंडे, किशोर गालफाडे, जतीन वाघमारे, संतोष सपकाळ आदी उपस्थित होते.

महापुरुषांनी सर्वधर्म समभाव या नात्याने कार्य करून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. क्रांतिगुरुंचे कार्य महान असून त्यांच्या माध्यमातून दीनदुबळ्यांना, शोषितांना, अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला. अशा महापुरुषांचा इतिहास नवीन पिढी समोर मांडला गेला पाहिजे, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.