विजयस्तंभ अभिवादन तयारीचा जिल्हा प्रशासनाने घेतला आढावा

सातारा

सूक्ष्म नियोजन करण्याचे डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश

पुणे,(प्रतिनिधी) : भीमा- कोरेगाव येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजय स्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला.

अभिवादन सोहळ्यास येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याचा अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढाव बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थचे महासंचालक सुनील वारे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार, निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.