अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून कांबळे यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव
सातारा,(प्रतिनिधी) : संजीवन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी रवींद्र उत्तमराव कांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
साताऱ्यातील चिपळूणकर बागे शेजारील राहत्या घरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन वाढदिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रीक्षेत्र यवतेश्वर येथील मंदिरात रविदादा कांबळे यांनी सपत्नीक योगेश्वर महादेवाची पूजा व महाआरती केली. त्यानंतर उपळी ता.सातारा येथील स्वर्गीय शारदाबाई पवार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. सकाळी दहा वाजता आसनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब गरजू व होतकरू अशा दोन मुली व पाच मुलांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेण्यात येऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. दुपारी बारा वाजता रहिमतपूर रोड कोडोली येथील आशा भवन या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर शेंद्रे येथील हॉटेल प्रियांका मध्ये केक कापून हितचिंतकांच्या शुभेच्छांचा स्वीकार व मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. सायंकाळी साडेपाच वाजता मंगळवार पेठेतील शाहू बोर्डिंग येथील धनिनीची बाग येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर पोवई नाक्यावरील भाजी मंडई मार्केट यार्ड येथे केक कापून उपस्थित त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला. रात्री आठ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे,तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश तांबे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के,संजीवन संस्थेचे सचिव मिलिंद कांबळे, व्यापारी अमिन कच्छी आदींच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
विविध मान्यवरांनी श्री.कांबळे यांच्या व्यापार क्षेत्रातील भरारीबरोबरच सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच पदरमोड करून समाजसेवेचे हे व्रत अखंड जपण्याची वृत्ती आदर्शवत आहे, असेही सांगितले.
सातारा शहराच्या मंगळवार पेठेतील धनीणीची बाग शाहू बोर्डिंग येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप प्रसंगी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली.रवीदादांसारख्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे गोरगरिबांच्या घरातील आणि अनाथ मुलांना गोड घास मिळतो, अशा समाजसेवी व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो, असे यावेळी बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनी सांगितले.
श्री क्षेत्र यवतेश्वर येथे महाआरती व पूजा केल्यानंतर तेथील पुजारी मंडळींनी रवीदादांच्या सर्व कार्यात यश लाभो, अशा शब्दात त्यांना आशीर्वाद दिले. तसेच समाजसेवा व अध्यात्मिक क्षेत्रात रवीदादांच्या माध्यमातून होत असणारे उपक्रम सर्वांसाठीच दिशादर्शक आहेत, असेही सांगितले.
उपळी ता.सातारा येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी रवीदादांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेले शैक्षणिक साहित्य व खाद्यपदार्थांमुळे आपल्या जीवनात आलेले आनंदाचे क्षण कायम स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. केवळ देखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष गोरगरिबांपर्यंत भेटून त्यांचे अश्रू पुसणारे रवीदादांसारखे समाजसेवक दुर्मिळ आहेत, अशा प्रतिक्रियाही या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केल्या.
आसनगाव ता.सातारा शाळेतील दोन विद्यार्थिनी व पाच विद्यार्थी अशा सात जणांना शैक्षणिक दृष्ट्या वर्षभरासाठी दत्तक घेतल्याबद्दल संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनीही समाधान व्यक्त करतानाच गरिबीची जाणीव ठेवून मदत करणारे रविदादा आदर्श समाजसेवक आहेत. इतरांना मदतीचा हात देणारे रवीदादा समाजाला दिशा देणारे कर्तुत्व, वक्तृत्व व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम आहेत. त्यांना उज्वल यश लाभो, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कोडोलीतील आशा भवन येथील विशेष मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले, तेथील विद्यार्थी व शिक्षकांनी भविष्यात आपणही रवी दादांसारखे इतरांना मदत करणारे समाजसेवक होणार असल्याची भावना व्यक्त केली. विशेष मुलांच्या या प्रतिक्रियांमुळे संवेदनशील मनाचे रविदादा भारावून गेले.
आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार उपराकार लक्ष्मण माने यांनी दूरध्वनीवरून श्री.कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच समक्ष कार्यक्रमास उपस्थित राहून पोलीस निरीक्षक निलेश तांबे, राजेंद्र मस्के , बाजार समितीचे मोरे, अमिन कच्छी, आदित्य कांबळे, महेश पागडे, बाबू सकुंडे, मुश्ताक शेख, तानाजी चव्हाण, आबा धनवडे, दिलावर शेख, विनोद यादव, राहुल शेठ, सौरव जमदाडे, दीपक अवकीरकर, शिवाजी परदेशी आदिंनी शुभेच्छा दिल्या.