‘भूमिशिल्प’चे पद्माकर सोळवंडे, ‘पुढारी’चे आदेश खताळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

शरद महाजनी यांचेतर्फे सातार्‍यात गुरुवारी पुरस्कार वितरण समारंभ सातारा,(प्रतिनिधी): ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्यांच्या आई- वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पहिला पुरस्कार ‘भूमिशिल्प’चे संपादक पद्माकर सोळवंडे व दैनिक ‘पुढारी’चे आदेश खताळ यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार (गुरुवारी) सकाळी 11.30 वाजता दैनिक ‘पुढारी’ कार्यालयात प्रदान केला जाणार आहे. दोन्ही पत्रकारांचा सन्मान दैनिक ‘पुढारी’चे विभागीय […]

Continue Reading

‘श्वेतपर्व’ मधून व्यक्त होताना भारावली सातारची माहेरवाशीण

सातारा ग्रंथमहोत्सवात अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे यांची प्रदीप कांबळे, प्रताप गंगावणे यांनी घेतली प्रकट मुलाखत सातारा,(प्रतिनिधी) : सातारा ग्रंथ महोत्सवाने सलग दोन तप वाचन संस्कृती रुजवण्याबरोबरच कला, संस्कृती, साहित्य क्षेत्रात साताऱ्याचे नाव उज्वल करणाऱ्या भूमिपुत्र व भूमीकन्यांना बोलते केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या निर्मात्या तसेच उद्योजिका श्वेता शिंदे […]

Continue Reading

मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धांचा महत्त्वाचा वाटा : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन सातारा,(प्रतिनिधी) : मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. अशा स्पर्धांमुळे त्यांच्यात सांघिक भावना वाढीस लागते आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले. येथील मुला-मुलींच्या निरीक्षण गृह/बालगृहात आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उद्घाटन नागराजन […]

Continue Reading

साताऱ्यात शालेय पोषण आहार संघटनेचा मोर्चा

थकीत मानधनासह विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन सातारा, (प्रतिनिधी): शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने (आयटक) सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधनासाठी भीक माँगो आंदोलन करण्यात येणार होते. पण मोर्चाद्वारे विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासन तसेच झेडपीचे सीईओ याशनी नागराजन यांना देण्यात आले. हे आंदोलन पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी […]

Continue Reading

हरित साताऱ्याचा प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार

अनंत इंग्लिश स्कूलमधून विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती सातारा, (प्रतिनिधी):पर्यावरण संवर्धनासाठी साताऱ्यातील हरित सातारा संस्थेने प्लास्टिक निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. अनंत इंग्लिश स्कूलमध्ये या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, जिथे इयत्ता पाचवी ते आठवीच्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्तीच्या मोहिमेत सहभाग घेतला. प्लास्टिक पिशव्या उघड्यावर टाकल्यामुळे गुरांच्या मृत्यूपासून मानवी आरोग्याला धोका आणि पर्यावरणाच्या हानीपर्यंत अनेक गंभीर परिणाम […]

Continue Reading

महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा ‘मधाचे गाव मांघर’वर आधारित

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राची प्रतिष्ठा सातारा,(प्रतिनिधी): दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राच्या वतीने ‘मधाचे गाव’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावावर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. देशातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळख मिळालेल्या मांघर गावाच्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे. ज्या राज्यांच्या चित्ररथांना कर्तव्यपथावरील संचलनात संधी मिळत नाही, […]

Continue Reading

साताऱ्यात शुक्रवारपासून चोवीसावा ग्रंथ महोत्सव

जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीनगरीमध्ये रंगणार साहित्य, संस्कृतीचा मेळा सातारा, (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीमध्ये २४वा ग्रंथ महोत्सव दि. १० ते १३ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार राजीव खांडेकर व ज्येष्ठ लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने विविध कला, संस्कृती […]

Continue Reading

सातार्‍यात गरजू पत्रकारांसाठी म्हाडातून घरे; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची घोषणा

सामाजिक तेढ रोखण्यात साताऱ्याच्या पत्रकारितेचे योगदान सातारा,(प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देणाऱ्या सातार्‍यातील पत्रकारितेला आदर्श परंपरा आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पत्रकारांसाठी हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी यांनी सूचित केल्यानुसार म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, जातीय तेढ रोखून सामाजिक सलोखा राखण्यात […]

Continue Reading

सातारा जिल्हा पत्रकार भवनात बहरणार पत्रकार दिन सोहळा

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती सातारा,(प्रतिनिधी) : मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ६ जानेवारी हा ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचा पत्रकार दिन साताऱ्यातील जिल्हा पत्रकार भवनाच्या इमारतीत प्रथमच होत असून हा ऐतिहासिक कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार […]

Continue Reading

नागठाणे भाग पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे सोमवारी वितरण

दै. ऐक्यचे गुरुदास अडागळे यांना शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कारांचे वितरण सातारा,(प्रतिनिधी) : नागठाणे विभाग पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार व पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोमवार, दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नागठाणे, ता. सातारा येथील नागठाणे कॉलेजच्या प्रांगणात […]

Continue Reading