मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे जिल्ह्यात जल्लोषी स्वागत

फ्लेक्स, विद्युत रोषणाई, पेढे तुला व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसह साताऱ्यात आनंदोत्सव सातारा,(प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रीपदाची घोषणा झाल्यावर प्रथमच जिल्ह्यात आगमनकर्ते झालेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फ्लेक्स, विद्युत रोषणाई, पेढे तुला, जेसीबीमधून व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसह साताऱ्यात अक्षरशः आनंदोत्सव साजरा करण्यात आला. […]

Continue Reading

सातारा पत्रकार संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध

अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी भाेईटे, उपाध्यक्षपदी बांबरे, संघटकपदी जगताप, सचिवपदी चेणगे तर खजिनदारपदी वाघमारे सातारा,(प्रतिनिधी) : सातारा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्षपदी उमेश भांबरे, सचिवपदी गजानन चेणगे, संघटकपदी अजित जगताप, खजिनदारपदी अमित वाघमारे यांच्यासह १३ जणांच्या कार्यकारिणीची लोकशाही मार्गाने निवडणूकीची प्रक्रिया पार पाडून बिनविरोध निवड झाली. पुणे विभागीय अधिस्‍वीकृती समितीचे […]

Continue Reading

जिल्ह्यातील उड्डाणपुलांसाठी उदयनराजेंचा गडकरींकडे पाठपुरावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्लीत घेतली भेट सातारा,(प्रतिनिधी): उंब्रज येथुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लायओव्हर बनविणेत यावा, तसेच या ठिकाणी सेवा रस्त्यावर ड्रॉप ॲन्ड पिकअप पॉईट करावा. नागठाणे येथे फ्लायओव्हरच्याखाली प्रस्तावित असणारा अंडरपास मोठा करावा, वाहतुक आणि नागरिकांच्या दृष्टीने […]

Continue Reading

हॉटेल ‘गुलबहार’ २९ लाखाच्या थकबाकीसाठी पालिकेकडून सील

सातारा पालिकेचा दणका ; अंशतः रक्कम भरल्याने कारवाई शिथिल सातारा,(प्रतिनिधी) : थकीत करवसुलीच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने कारवाई गतिमान केली आहे. २९ लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी पोवई नाक्यावरील सुप्रसिद्ध गुलबहार हॉटेल बुधवारी वसुली विभागाचे कर अधिकारी उमेश महादर यांनी सील केले. या कारवाईने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. सात दिवसाच्या मुदतीला प्रतिसाद न मिळाल्याने […]

Continue Reading

‘बेडर – बेरड जात महाराष्ट्रात उपेक्षित राहिली’ सदाशिव नाईक यांची खंत

महायुती सरकारने विशेष लक्ष घालून प्रश्न सोडवण्याची मागणी सातारा,(प्रतिनिधी) : हजारो वर्षापासूनच्या इतिहासात बेडर बेरड हा निर्भयपणे लढणारी जात आहे. प्रामाणिकपणा इमानदारी आणि लढाऊ वृत्ती असलेल्या बेरड जातीवर इंग्रजांच्या काळात “चोर, लुटारू” असा शिक्का मारला गेला आणि मुख्य प्रवाहापासून बेडर – बेरड अनेक मैल दूर गेला. आजही देखील महाराष्ट्रात खेडोपाड्यात विखुरलेल्या अवस्थेत अल्पसंख्य असलेले आर्थिक […]

Continue Reading

आ.शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

सातारा – जावलीसह जिल्ह्यात शिवेंद्रराजे प्रेमींचा जल्लोष सातारा ,(प्रतिनिधी): “मी शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, ईश्वरसाक्ष मंत्रीपदाची शपथ घेतो की….” हे शब्द उपराजधानी नागपूरमधील विधान भवनाच्या प्रांगणातील ध्वनीक्षेपकातून घुमले आणि स्वराज्याची राजधानी साताऱ्यासह संपूर्ण जिल्ह्यातून समाधानाची लकेर उमटली. सातारा -जावली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांकाचे मताधिक्य घेतलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीपद […]

Continue Reading

समाजोपयोगी उपक्रमाने रवींद्र कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून कांबळे यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव सातारा,(प्रतिनिधी) : संजीवन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी रवींद्र उत्तमराव कांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. साताऱ्यातील चिपळूणकर बागे शेजारील राहत्या घरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर गुरुजी […]

Continue Reading

शंभर रुपयांच्या स्टॅम्पच्या कृत्रिम टंचाईप्रकरणी सागर भोगावकर यांचा आक्रमक पवित्रा

उपजिल्हाधिकाऱ्यांची स्टॅम्पवेंडर्सना सक्त ताकीद सातारा,(प्रतिनिधी) : सातार्‍यात तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प विक्री करणाऱ्या स्टॅम्प वेंडर मंडळींकडून 100 रुपयांच्या स्टॅम्पची कृत्रिम टंचाई केली जात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी गुरुवारी (दि.१२) एल्गार पुकारत आक्रमक पवित्रा घेतला व स्टॅम्प व्हेंडर यांच्या शेजारी उभे राहून याबाबत खातरजमा केली […]

Continue Reading

रवींद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम

सातारा,(प्रतिनिधी): येथील संजीवन बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यापारी रवींद्र उत्तमराव कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.१३ रोजी सातारा शहर व परिसरात विविध सामाजिक उपक्रम व भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवणारे समाजसेवक म्हणून श्री. कांबळे यांची ख्याती आहे. होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप तसेच […]

Continue Reading

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला राष्ट्रपतींच्या हस्ते दोन राष्ट्रीय पुरस्कार

सातारा जिल्ह्याचा राजधानी दिल्लीत डंका : सर्वोत्तम ग्रामपंचायत अन् ग्रामउर्जाचा विशेष पुरस्कार प्रदान सातारा (प्रतिनिधी) : विविध शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी सन्मान झालेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या लौकिकात राष्ट्रीय पुरस्कारांची आणखी मोहर उमटली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणखी दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी या गावचा बुधवारी राजधानी दिल्लीत गौरव करण्यात […]

Continue Reading