बिल्डर्स असोसिएशनतर्फे साताऱ्यात “रचना २०२४” वास्तु प्रदर्शन

२६ ते २९ डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषद मैदानावर आयोजन सातारा,(प्रतिनिधी): शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर तर्फे आयोजित ” रचना २०२४” हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राऊंन्ड,सातारा येथे दि. २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत (सकाळी १०.०० […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये विद्यार्थी -पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

सातारा,(प्रतिनिधी): सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये इ.बारावी विद्यार्थी -पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला. पालक मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा.दशरथ जाधव यांनी केले.प्रास्ताविकात पालक मेळावा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक प्रयत्न करतात तसेच पालकांनी आपल्या पाल्याकडे वेळ व लक्ष द्यावे असे सांगितले.रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य बोर्डाचे सचिव प्रा.संदीप भुजबळ […]

Continue Reading

प्रा.जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांची मागणी सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी जीवाचे रान करणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाँग मार्चचे प्रणेते प्रा‌.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांनी परिषदेत केली.याबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading

निवडणुकीतील विजयाचे श्रेय छ.शिवाजी महाराजांच्या विचारांना

खासदार श्री. छ‌. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आहे. भारतीय जनता पक्ष व महायुतीतील पक्षांनी शिवरायांचे विचार आचरणात आणले, त्यामुळेच मतदारांनी आम्हाला मोठा प्रतिसाद दिला व राज्यात महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार श्री. छ‌. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीतील […]

Continue Reading

आ.शिवेंद्रराजे राज्यात नंबर वन ; १ लाख ४२ हजार १२४ चे मताधिक्य

जिल्ह्यातील आठही मतदार संघात महायुतीचा डंका; पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण या आमदारांना पराभवाचा धक्का सातारा,(प्रतिनिधी) : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा – जावली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले १ लाख ४२ हजार १२४ इतक्या मताधिक्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्यावर मात करून पाचव्यांदा विधानसभेत दाखल झाले आहेत. हे मताधिक्य राज्यात […]

Continue Reading

आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जितेंद्र डूडी

३,१६५ मतदान केंद्रावर १६,२६१ निवडणूक कर्मचारी नियुक्त सातारा,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात बुधवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली असून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. दरम्यान, सेक्टर ऑफीसर ४३६, केंद्राध्यक्ष ३,९५६ व इतर कर्मचारी […]

Continue Reading

गद्दार शब्द वापरणे शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारे

खा.उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात घणाघाती टीका; गांधी मैदानावर प्रचाराची सांगता सभा उत्साहात सातारा (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे वयाने व राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत, मात्र वाई येथील सभेत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गद्दार हा शब्द वापरणे चुकीचे आहे. राज्यात महायुतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत, मात्र यापूर्वी साठ वर्षे सत्ताधाऱ्यांना या योजना […]

Continue Reading

रयत क्रांती संघटनेची सोमवारी साताऱ्यात बैठक

महायुतीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने रयत क्रांती संघटनेचा एल्गार सातारा,(प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत महायुतीकडून दूजाभाव करीत सापत्न वागणूक मिळत असल्याने आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे पदाधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची निर्णायक बैठक सोमवार, दि.१८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार, […]

Continue Reading

आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ रविवारी राजवाड्यावर जाहीर सभा

उदयनराजेंसह महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींची भाषणे रंगणार सातारा,(प्रतिनिधी) : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. १७ रोजी सायंकाळी पाच वाजता साताऱ्यात राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर विराट प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या […]

Continue Reading

राष्ट्रीय बोलीभाषा कवितालेखन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

प्राचार्य बापूसाहेब उनउने स्मृत्यर्थ कर्मवीर विद्यापीठातर्फे साताऱ्यात आयोजन सातारा,(प्रतिनिधी) : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने राष्ट्रीय मराठी व कोकणी भाषेतील बोलीभाषा खुल्या कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धेसाठी मराठीच्या विविध बोली भाषेतून कोल्हापुरी, चंदगडी, मराठवाडी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मॉरिशस […]

Continue Reading